Ad will apear here
Next
‘गाळ्यांच्या ई-लिलावाची प्रक्रिया लवकरच सुरू’
सोलापूर : ‘शासनाच्या सूचनेनुसारच सोलापूर महापालिकेच्या सर्व गाळ्यांची लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून, पाणीपुरवठा विभागाकडून नळ जोडणीच्या ठिकाणी लवकरच स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहे,’ अशी माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

‘गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेत कोणताही बदल करण्यात येणार नाही. त्यासाठी आवश्‍यक कार्यवाहीचा मसुदा तयार झाला असून, येत्या आठ ते दहा दिवसांत ही प्रक्रिया सुरू होईल,’ असेही त्यांनी या वेळी सांगितले.  

डॉ. ढाकणे म्हणाले, ‘महापालिकेच्या मालकीच्या मेजर व मिनी अशा एक हजार ३८६ गाळ्यांची लिलाव प्रक्रिया केली जाणार आहे. गाळेधारक, व्यापारी व इतरांचा कोणत्याही प्रकारचा विरोध होत असला, तरी ही प्रक्रिया महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी व निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी राबविण्यातच येणार आहे. प्रथम महापालिकेचे ५१४ मेजर गाळे यांची निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. आठ ते दहा दिवसांतच सर्व बाबींची शहानिशा व पूर्तता केली जाईल. या निविदा प्रक्रियेसाठी महापालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागाकडून २६ प्रकारची नियमावली तयार करण्यात आली असून, ते नियम, अटी व शर्ती निविदा धारकासाठी लागू असणार आहेत. त्यांचा भंग होत असेल, तर गाळा परत घेण्याचे अधिकार महापालिकेला असतील.’

गाळे निविदा प्रक्रियेसाठी तयार करण्यात आलेल्या अटी व शर्तींसंदर्भात चर्चा करण्यासाठी गाळेधारक व व्यापाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती; मात्र या बैठकीस ते उपस्थित राहिले नाही. सूचना व शिफारशीत सुधारणा करण्यासाठी आपली तयारी आहे. यावर आपण चर्चा करण्यासाठी तयार होतो; पण तसे झाले नाही. महापालिकेचे हित महत्त्वाचे असून, यासाठी कोणत्याही प्रकारचा विरोध आपण पाहणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट करतानाच हेच पॅटर्न अन्य महापालिकेनेही आपल्याकडून मागवून घेतल्याचे त्यांनी सांगितले.

‘शहरात शासकीय निमशासकीय व खासगी जागांवरील डिजिटल फलक लावण्याची निविदा काढण्यात आली आहे. एका वर्षासाठी एक कोटी ५९ लाख रुपये अशी निविदा किंमत आहे. फलके लावण्यासाठीचे दर निश्‍चित करण्यात आले आहेत, तर खासगी जागेवर डिजिटल फलक लावताना खाजगी मिळकतदारांनी महापालिकेची परवानगी घेणे जरुरीचे आहे. पाणीपुरवठा विभागाकडून नळ जोडणीच्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. त्याची प्रक्रियाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे,’ असेही डॉ. ढाकणे यांनी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZUOBQ
Similar Posts
साडेतीन हजार पुस्तके भेट देणारा माणूस पंढरपूर : सावळ्या विठूरायाच्या पंढरीत विठूरायाच्या भक्तीने वेडी झालेली अनेक माणसे येत असतात. असाच एक वेडा माणूस पंढरपुरात आहे; पण त्याचे वेड जरा वेगळे आहे. ते वेड आहे लोकांना पुस्तके भेट देण्याचे. आजपर्यंत विविध प्रसंगांच्या निमित्ताने या माणसाने जवळपास साडेतीन ते चार हजार पुस्तके लोकांना भेट दिली आहेत
पंढरपुरात झाली छायाचित्रकारांसाठी कार्यशाळा सोलापूर : जागतिक छायाचित्रण दिनाचे (१९ ऑगस्ट) औचित्य साधून पंढरपूर येथील फोटोग्राफर विकास मंचाच्या वतीने छायाचित्रकारांसाठी निःशुल्क कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पंढरपूर येथील ‘हॉटेल विठ्ठल इन’च्या हॉलमध्ये १४ ऑगस्ट रोजी झालेल्या या कार्यशाळेला पंढरपूर शहर व तालुक्यातील छायाचित्रकारांचा चांगला प्रतिसाद मिळाला
पंढरपूरच्या विकासासाठी कॅनडाचे दोन हजार कोटी पंढरपूर : ‘शहराच्या विकासासाठी कॅनडा सरकारने आर्थिक साह्य करण्याची घोषणा केली आहे. कॅनडा सरकारने दोन हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे,’ अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी दिली. भारत आणि कॅनडा सरकारच्या मैत्रीला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने परदेशी शहराच्या धर्तीवर
लोटस इंग्लिश स्कूलमध्ये कायदेविषयक शिबिर सोलापूर : येथील श्री विठ्ठल एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूल (कासेगाव, ता. पंढरपूर) येथे तालुका विधी सेवा समिती व पंढरपूर अधिवक्ता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language